---Advertisement---

नाशिक येथे उद्या ‘महिला आयोग आपल्या दारी’

---Advertisement---

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांची माहिती

नाशिक लाईव्ह न्यूज । २९ मे २०२५ । जिल्ह्यातील समस्याग्रस्त, पीडित महिलांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शुक्रवार ३० मे २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जनसुनावणी होणार आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.

या जनसुनावणीत तक्रारदार, पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तत्काळ मदत व्हावी, कोणतीही पीडित महिला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट जनसुनावणीस उपस्थित राहून आपली समस्या लेखी स्वरूपात आयोगापुढे मांडू शकेल. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलिस विभाग, समुपदेशन केंद्राच्या सुविधा उपलब्ध असतील. तसेच पोलिस विभागाकडील महिला व मुलांकरीता असलेल्या साहाय्य कक्षाकडे प्राप्त असलेली प्रकरणे, महानगरपालिका व नगरपरिषद येथील समुपदेशन केंद्राकडील प्राप्त प्रकरणे या जनसुनावणीत ठेवण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील महिलांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लबसमोर, नाशिक- पुणे महामार्ग, नाशिक येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५३- २२३६३६८ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---