नाशिक लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२५ । केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला प्राप्तिकरात अनेक सवलती दिल्यानंतर, केंद्र आता मध्यम आणि निम्न उत्पन्न गटातील कुटुंबांना वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) कपात करून मोठा दिलासा देण्याची तयारी करत आहे. केंद्र सरकारकडून १२ टक्क्यांचा जीएसटी स्लॅब हटवण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या ०%, ५% , १२ %, १८ % आणि २८ % असे जीएसटीचे पाच स्लॅब आहेत. यामधील १२% हा स्लॅब बंद करण्यात येऊ शकतो किंवा त्यामधील अनेक वस्तूंना ५% स्लॅबमध्ये टाकण्यात येऊ शकते. केंद्र सरकारने हा बदल केल्यास दररोजच्या वापरातील वस्तू स्वस्त होणार आहेत. टूथपेस्ट, केश तेल ते चप्पल, स्टेशनरी वस्तू अन् लस्सी यासारख्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. पाहूयात कोण कोणत्या वस्तू स्वस्त होऊ शकतात…
१२ टक्के GST अंतर्गत येणाऱ्या दररोजच्या वापरातल्या वस्तू :
टूथ पावडर :(दात घासण्याची पावडर)
सॅनिटरी नॅपकिन्स : (याच्यावर सध्या0% GST आहे, पण इतर काही स्त्रियांसाठीच्या स्वच्छता वस्तूंवर 12% GST आहे)
केसांचे तेल: रोज वापरले जाणारे हेअर ऑइल.
साबण : काही प्रकारची साबण (काही साबणांवर 18% GST आहे).
टूथपेस्ट: काही ब्रँडेड टूथपेस्ट (काहींवर 18% GST आहे).
छत्री :
शिलाई मशीन : कपडे शिवण्यासाठी वापरली जाणारी मशीन.
पाण्याचे फिल्टर : विजेवर न चालणारे वॉटर फिल्टर आणि प्युरिफायर.
प्रेशर कुकर: स्वयंपाकासाठी वापरले जाणारे.
स्वयंपाकाची भांडी : अॅल्युमिनियम, स्टीलची काही भांडी (काहींवर 12% GST आहे).
इलेक्ट्रिक इस्त्री :
वॉटर हिटर (गिझर):
व्हॅक्यूम क्लिनर: छोट्या क्षमतेची, घरगुती वापरासाठी.
वॉशिंग मशीन:
सायकल:
अपंगांसाठीच्या गाड्या
पब्लिक ट्रान्सपोर्ट वाहने: विक्रीसाठी (प्रवासाच्या भाड्यावर नाही).
रेडिमेड कपडे: 1,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे.
फुटवेअर: 500 ते 1,000 रुपये किमतीचे बूट.
लसी, लोणी, तूप : बऱ्याच लसींवर 12% GST तो कमी होऊ शकतो.
डायग्नोस्टिक किट: HIV, हिपॅटायटिस, टीबी यांसाठी चाचणी किट.
आयुर्वेदिक आणि युनानी औषधे: काही खास प्रकारची औषधे.
वह्या :
ज्योमेट्री बॉक्स :
नकाशे आणि ग्लोब: शैक्षणिक वापरासाठी.
ग्लेझ्ड टाइल्स : साध्या, नॉन-लक्झरी टाइल्स.
रेडी-मिक्स काँक्रीट (बांधकामासाठी तयार मिश्रण)
प्री-फॅब्रिकेटेड इमारती :
शेतीची उपकरणे (यांत्रिक थ्रेशरसारखी उपकरणे)
पॅकेज्ड खाद्यपदार्थ : कंडेन्स्ड मिल्क, गोठवलेल्या भाज्या (काही प्रकार).
सोलर वॉटर हिटर :
मोबाईल –
बदाम, फळांचा रस, भाज्या, फळे, लोणचे, मुरांबा, चटणी, जाम, जेली, नारळ पाणी
हॉटेल रुम, (प्रति रात्र भाडे ७५०० रुपयांपर्यंत),नॉन इकोनॉमिक क्लास (हवाई प्रवास)
सरकारवर किती कोटींचा बोजा पडणार ?
रिपोर्ट्सनुसार, १२ टक्क्यांचा स्लॅब कमी केला अथव काही वस्तू ५ टक्क्यांमध्ये नेल्या तर केंद्र सरकारला ४० हजार ते ५० कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे. जीएसटीममुळे वस्तू स्वस्त झाल्यास विक्रीमध्ये वाढ होईल अन् जीएसटी संकलन मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज बांधला जातोय. कमी किमतीमुळे विक्री वाढेल, ज्यामुळे कराचा आधार वाढेल आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून GST संकलनात वाढ होईल. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी GST दरांमध्ये संभाव्य बदलांचे संकेत दिले होते.