---Advertisement---

Budget 2025 : टीव्ही, मोबाईल.. ; अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग?

budget (4)
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२५ । देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दिशादर्शक असलेला अर्थसंकल्प 2025-26 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज शनिवारी संसदेत सादर केला. हा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा पूर्ण अर्थसंकल्प असून, निर्मला सीतारामण यांनी सलग आठव्यांदा ही जबाबदारी सांभाळली आहे.

स्वस्त होणारे उत्पादने
या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणार्‍या अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कॅन्सरची औषधे स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 36 जीवनावश्यक औषधांवर करामध्ये सूट देण्यात आली असून, कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी पूर्णपणे हटवण्यात आली आहे. अर्थसंकल्पामुळे काय स्वस्त होणार याबाबत अर्थमंत्र्यांनी घोषणा केली.

या वस्तू होणार स्वस्त?
टीव्ही, मोबाईल, औषधे, इलेक्ट्रिक कार, एलईडी आणि एलसीडी टीव्ही यासारख्या उत्पादनांवरील कर कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे ही उत्पादने स्वस्त होणार आहेत. चामड्याच्या वस्तूही स्वस्त होणार आहेत.

उद्योग आणि कृषी क्षेत्राला चालना
कृषी क्षेत्राला मोठी भेट देताना, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. हे बदल किसानांना अधिक आर्थिक सुविधा प्रदान करण्यात मदतील होतील.

ऑटोमोबाईल क्षेत्रालाही या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आली आहे. जहाजांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर बेसिक कस्टम ड्युटी आणखी 10 वर्षांसाठी सूट देण्यात आली आहे.

आरोग्य आणि शिक्षण क्षेत्र
आरोग्य क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. कॅन्सरच्या रुग्णांसाठी औषधे स्वस्त करण्याव्यतिरिक्त, विविध आरोग्य सुविधांना वाढीव अर्थसहाय्य देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---