---Advertisement---

नाशिकसह राज्यात आज कसं राहणार तापमान? वाचा आजचा हवामान अंदाज..

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२५ । राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली असून, उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवू लागला आहे. सध्याच्या कोरड्या हवामानामुळे सरासरी कमाल तापमान ३० अंशापर्यंत गेले आहे. दरम्यान आज नाशिकसह राज्यभर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच, किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तर २ फेब्रुवारीपासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात तीन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तवली आहे. बुधवारी नाशकात कमाल तापमान ३४.३ इतके होते तर किमान तापमान १४.६ इतके होते.

काल निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील सर्वात कमी तापमान १२.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमान १३ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान कायम राहिले आहे. काल सकाळपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरी येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर जेऊर, सोलापूर, अकोला आणि ब्रह्मपुरी येथे पारा ३५ अंशांपार गेला. राज्यभर बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या वर राहिले आहे.

फेब्रुवारीच्या सुरुवातीला राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पश्चिमी चक्रवातांचा प्रभाव कायम असून, वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १४५ नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय आहेत. उत्तर भारतातही थंडीचा जोर कमी-जास्त होत आहे. काल हरियाणातील नर्नूल येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी तापमान ४.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---