---Advertisement---

उद्या राहणार संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक शहर वासियांसाठी एक महत्वाची बातमी आहे.गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनमधील विविध कामांमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने शनिवारी (दि. असल्यान १) संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

तर रविवारी (दि. २) सकाळी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी आजच पुरेशा पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरासाठी रोज ६०० एमएलडी इतके पाणी गंगापूर, मुकणे धरण व अल्प प्रमाणात दारणा धरणावरून पुरवले जाते. सध्या धरणे तुडुंब भरलेली आहेत. मात्र येत्या उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरावे याचे महापालिकेकडून नियोजन सुरू आहे. त्यामुळेच वीज कंपनीच्या विविध कामांदरम्यान पालिकेकडून पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येऊन एका अथनि पाणी वाचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा होणार नाही तर रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरात चौथ्यांदा पाणीपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---