नाशिक लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२५ । उन्हाळा म्हटलं की अनेकदा पाणीटंचाईचा प्रश्न समोर येतो. सध्या राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढली असून यातच काही ठिकाणी पाणी टंचाईचे चटके बसत आहे. पंरतु नाशिककरांना दिलासा देणारी एक बातमी आहे. ती म्हणजे नाशिक जिल्ह्यातील लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अधिक जलसाठा शिल्लक आहे.
१५ एप्रिल २०२५ पर्यंत नाशिक जिल्ह्याच्या धरणातील एकूण पाणीसाठी ३६.२८ टक्के इतका आहे. विशेष गेल्या वर्षी २०२४ मध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण जलसाठा ३१ टक्क्यापर्यंत होता. यंदा मात्र यात वाढ दिसून येत आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये १५ एप्रिल २०२५ रोजी ५८.८३ टक्के जलसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणात १५ पेक्षा अधिक जलसाठा आहे. यामुळे नाशिककरांना यंदा पावसाळा सुरु होईपर्यंत टंचाई जाणवण्याची शक्यता कमी आहे.
खरंतर गेल्या वर्षी राज्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने राज्यातील धरणांमध्ये मुबलक जलसाठा होता. यामुळे उन्हाच्या आधी राज्यात पाणीटंचाई जाणवणार नाही असं वाटत होते. मात्र उन्हाची तीव्रता वाढल्याने काही ठिकाणी पाणी टंचाईचे चटके बसत आहे. परंतु नाशिकमधील धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा ५ टक्केपेक्षा अधिक जलसाठा दिसून येत आहे.
जिल्ह्यातील कोणत्या धरणांमध्ये किती जलसाठा
गंगापुर…… गेल्या वर्षी- 42.66…. यंदाच्या वर्षी -58.83
काश्यपी…… गेल्या वर्षी- 43.14…. यंदाच्या वर्षी – 89.36
गौतमी गोदावरी …… गेल्या वर्षी- 32.07…. यंदाच्या वर्षी 9.48-
आळंदी……गेल्या वर्षी- 18.75 …… यंदाच्या वर्षी- 24.75
पालखेड…… गेल्या वर्षी- 38.13 …… यंदाच्या वर्षी- 37.98
करंजवण…… गेल्या वर्षी- 15.57 …… यंदाच्या वर्षी- 17.17
वाघाड …… गेल्या वर्षी- 10.03 ……यंदाच्या वर्षी- 12.86
ओझरखेड …… गेल्या वर्षी- 5.21 ……यंदाच्या वर्षी- 30.89
पुणेगाव …… गेल्या वर्षी- 00 …… यंदाच्या वर्षी- 4.01
तिसगाव …… गेल्या वर्षी- 00 …… यंदाच्या वर्षी- 12.75
दारणा …… गेल्या वर्षी- 24.05 …… यंदाच्या वर्षी- 43.03
भावली …… गेल्या वर्षी- 24.05 …… यंदाच्या वर्षी- 43.03
मुकणे …… गेल्या वर्षी- 29.29 …… यंदाच्या वर्षी- 48.65
वालदेवी …… गेल्या वर्षी- 39.72 …… यंदाच्या वर्षी- 49.87
कडवा …… गेल्या वर्षी- 18.54 …… यंदाच्या वर्षी- 20.32
नांदुरमध्यमेश्वर…… गेल्या वर्षी- 61.09 …… यंदाच्या वर्षी- 84.05
भोजापुर…… गेल्या वर्षी- 4.71 …… यंदाच्या वर्षी- 4.43
चणकापुर …… गेल्या वर्षी- 19.32 …… यंदाच्या वर्षी- 34.24
हरणबारी …… गेल्या वर्षी- 37.99…… यंदाच्या वर्षी-40.31
केळझर…… गेल्या वर्षी- 16.78…… यंदाच्या वर्षी- 35.14
नागासाक्या…… गेल्या वर्षी-0.00….. यंदाच्या वर्षी- 12.09
गिरणा…… गेल्या वर्षी- 23.11….. यंदाच्या वर्षी- 30.37
पुनद….. गेल्या वर्षी- 68.65….. यंदाच्या वर्षी- 72.79
माणिकपुंज….. गेल्या वर्षी- 0.24….. यंदाच्या वर्षी- 0.00