नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक शहरातून सासू आणि सुनेमधील जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीने सासरच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागितल्याच्या वादातून ही हाणामारी झाल्याचं कळतंय. विशेष विशेष ही घटना चक्क न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच घडली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका महिलेच्या पतीचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. तिने न्यायालयात सासऱ्याच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मिळावा यासाठी केस दाखल केली आहे. मात्र सासरकडील मंडळी हिस्सा देण्यास तयार होत नसल्याने महिलेच्या नातेवाइकांमध्ये वाद सुरू होता. याप्रकरणात दुसऱ्या तारखेसाठी जेव्हा सासू आणि सुन न्यायालयात आले, तेव्हा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच त्यांच्यात बाचाबाची झाली.
सासु-सूनेमध्ये आणि अन्य सदस्यांमध्ये काही कारणांवरुन वाद होतात,मात्र वादे न थांबता.त्यातील सासु-सुनेमध्ये जोरदार हाणामारी होण्यास सुरुवात होते.व्हिडिओमध्ये सर्वांचा जोरदार हातापायी होताना तुम्हाला दिसून येत आहे.सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे. नाशिकचा मधील या घटनेचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून एक्सच्या ‘@ManojSh28986262’ या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड होताच लोकांनी व्हिडिओला हजारो संख्येने लाईक्स दिलेले आहेत तर लाखोंच्या संख्येने व्ह्यूजही व्हिडिओला मिळालेले आहेत.ऐवढेच नाही तर नेटकऱ्यांनी अनेक धम्माकेदार प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.
व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली आहे,”अरे पकडा यांना कोणी तरी” तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,”अरे देवा” तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,”खूप चिंताजनक गोष्ट आहे” तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.