---Advertisement---

जुन्या वादातून उडाला भडका, अंबडमध्ये टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । दोन टोळ्यांमध्ये जुन्या वादातून भडका उडाला असून एका टोळीने प्रतिस्पर्धी टोळीतील संशयित रहात असलेल्या इमारतीच्या खाली पार्किंग केलेल्या दोन वाहनांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. २) पहाटे संजीवनगर, अंबड येथे उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस चौकी अंबड पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद फैसल वाहिद शेख (रा. संजीवनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पायी जात असताना चार दुचाकीवरून आलेल्या १० ते १२ संशयितांनी हाताता कोयता, दांडके घेऊन आरडाओरड करत दहशत निर्माण केली. शेख यांनी हटकले असता संशयितांना त्यांच्यावर हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. टोळक्याने साई रुद्रा अपार्टमेंटमधील पार्किंग केलेल्या दोन कारवर कोयता, दांडके, रॉड मारून दोन्ही गाड्या फोडून टाकल्या. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

वाहन तोडफोडीच्या घटना
आतापर्यंत सातपूर ८ वाहने, नाशिकरोड ४ वाहने, ओमकारनगर (पंचवटी) ६ वाहने, इंदिरानगर ६ वाहने फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. या गुन्ह्यांत अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---