---Advertisement---

प्रवाशांना दिलासा ! नाशिकमार्गे धावणार अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या, कुठून कुठपर्यंत असणार?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२५ । रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची आहे. उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं नाशिकमार्गे भिवंडी – सांकराईल आणि खडगपूर-ठाणे दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

या विशेष गाड्यांमध्ये भिवंडी – सांकराईल अनारक्षित साप्ताहिक विशेष – 3 सेवा, 01149 अनारक्षित विशेष गाड्या 9 एप्रिल ते 23 एप्रिलपर्यंत दर बुधवारी भिवंडी येथून 22:30 वाजता सुटेल आणि सांकराईल माल टर्मिनल यार्ड येथे तिसर्‍या दिवशी दुपारी 1:00 वाजता पोहोचेल.

दरम्यान या गाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपुर, बिलासपुर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपुर, टाटानगर आणि खड़गपूर येथे थांबे देण्यात आले आहेत.

यूटीएसद्वारे बुक करा तिकीट
खडगपूर-ठाणे अनारक्षित साप्ताहिक विशेष 3 सेवेमध्ये 01150 अनारक्षित विशेष दिनांक 12 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत दर शनिवारी खड़गपुर येथून 23.45 वाजता सुटेल आणि ठाणे येथे तिसर्‍या दिवशी 10.30 वाजता पोहोचतील. या गाड्यांना टाटानगर, चक्रधरपूर, राउरकेला, झारसुगुड़ा, बिलासपुर, रायपुर, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण येथे थांबे देण्यात आले आहेत. या अनारक्षित विशेष गाड्या आणि कोचसाठी तिकिटे सामान्य शुल्कात यूटीएसद्वारे बुक करता येतील.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---