---Advertisement---

नाशिकमध्ये उद्या उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; असा आहे कार्यक्रमाचे नियोजन?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या बुधवारी (दि. १६ एप्रिल) गोविंदनगर येथील मनोहर गार्डनमध्ये उत्तर महाराष्ट्राचे विभागीय शिबिर होणार आहे. जवळपास आठ ते दहा प्रमुख नेते तसेच शिवसेना उबाठासाठी कायदेशीर लढाई लढणारे अॅड. असीम सरोदे यांचे मार्गदर्शन पक्ष पदाधिकारी व कार्यकत्यांना लाभणार आहे. खासदार राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे हेदेखील या शिबिरात मार्गदर्शन करतील. सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची तोफ धडाडणार आहे. या शिबिराचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील सत्तेत भाजपसोबत बसण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना लाचार नाही. त्यासाठी औरंगजेबाच्या कबरीला समाधी संबोधणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पाय चाटण्याची आम्हाला गरज नाही, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यामध्ये केला. ठाकरे शिवसेनेच्या विभागीय शिबिरासाठी पुढील तीन दिवस ते नाशिकमध्ये आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर टीका केली. देशातील अनेक राज्यांमध्ये इव्हीएमच्या मदतीने भाजप विजय मिळवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

असा आहे शिवसेनेचा (उबाठा) कार्यक्रम
सकाळी ९ वाजता : शाहिरी कार्यक्रम,
सकाळी १० वाजता : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन.
सकाळी १० ते ११ : चर्चासत्र आम्ही शिवसेनेत का? (वक्ते : खा. अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, खा. राजाभाऊ वाजे, राजन विचारे)
सकाळी ११ ते १२: महाराष्ट्र कुठे चाललाय ? (वक्ते आ. आदित्य ठाकरे)
दुपारी १२ ते १: बूथ व्यवस्था व मतदान यादी (वक्ते: विनायक राऊत
दुपारी २ ते ३ : संघटनेचा आत्मा व पुनर्बाधणी (वक्ते : अंबादास दानवे)
दुपारी ३ ते ४ : खोटे खटले, फेक नरेटिव्ह व महाराष्ट्रापुढील समस्या (ववते: अॅड. असीम सरोदे)
दुपारी ४ ते ४.३० : शाहिरी कार्यक्रम (शिवशाहीर स्वप्नील डुंबरे)
सायं. ५ वाजता एक धगधगता विचार. (चित्रफीत) सायं ६ वाजता : मार्गदर्शन – खा. संजय राऊत.
सायं. ६.३० वाजता : मार्गदर्शन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---