---Advertisement---

उद्धव ठाकरे ‘या’ तारखेला विभागीय बैठकीसाठी नाशकात

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी, तसेच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन करणारे तज्ज्ञही उपस्थित राहून शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

मनोहर गार्डन येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान हे शिबिर होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांकडून विभागीय बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती उपनेते सुधाकर बडगुजर यांनी दिली.

संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित असतील. ६ ते ९ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात तालुकानिहाय बैठका होणार आहेत. त्याचप्रमाणे, येत्या काही दिवसात शिबिरांच्या अनुषंगाने विविध समिती स्थापन करण्यात येणार आहेत. अशी माहिती देण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---