नाशिक लाईव्ह न्यूज । १४ मे २०२५ । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या भावात वाढ होत असल्याने खरेदीदारांच्या खिशाला फटका बसत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोने दर वाढीला ब्रेक लागला आहे. आज सोन्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
२४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ५४० रुपये प्रति तोळा घसरण झाली आहे. यांनतर २४ कॅरेट सोने प्रति तोळा ९६,०६० रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७६,८४८ रुपये झाली आहे. आज २२ कॅरेट सोन्याचे दर ८८,०५० रुपये प्रति तोळा आहे. यामध्ये ५०० रुपयांनी घसरण झाली आहे. काल हे दर ८८,५५० रुपये होते. ८ ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला ७०,४४० रुपये मोजावे लागणार आहे. या दरातदेखील घट झाली आहे. आज १८ कॅरेट सोने प्रति तोळा ७२,०४० रुपये झाली आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५७,६३२ रुपये झाली आहे. सोन्याची किंमत ४१० रुपयांनी कमी झाली आहे.
चांदीचा दर
सोन्याचे भाव जरी वाढत असले तरी चांदी मात्र स्थिर आहे. चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. ८ ग्रॅम चांदी ७८३.२० तर १० ग्रॅम चांदी ९७९ रुपयांवर विकली जात आहे. चांदी किंमत स्थिर आहे मात्र, हे दरदेखील मध्येच वाढतात.