---Advertisement---

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा ; नाशिकमध्ये कसं राहणार हवामान?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२५ । गेल्या काही दिवसापासून राज्यभरात उन्हाचा चटका वाढल्याने उन्हाच्या झळा आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. यातच वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे ऐन उन्हाळ्यात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाल्यामुळे १९ ते २१ मार्चदरम्यान विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

दुसरीकडे नाशिकसह मुंबई, पुण्यासह सोलापूर आणि कोकणात उन्हाची झळ लागण्याची शक्यता आहे.. मंगळवारी नाशिक येथे कमाल ३७.५ तर किमान १५.४ अंश नोंद झाली. कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान काल मंगळवारी किमान तापमानात ४ अंशापर्यंतची घट दिसून आली.

पश्चिम बंगालच्या उपसागराकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागावर अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे.

या ठिकाणी पावसाचा अंदाज
१९ मार्च : धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर
२० मार्च धुळे, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जळगाव,
२१ मार्च भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ
२२ मार्च भंडारा, गडचिरोली, वर्धा चंद्रपूर, गोंदिया, नागपूर,
२१ मार्च परभणी, हिंगोली, नांदेड नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---