---Advertisement---

चोरीस गेलेल्या १५ लाखांच्या महागड्या मोटारसायकलींसह तिघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । बुलेटसह आर वन फायु, पल्सर कंपनीच्या चोरीस गेलेल्या १५ लाख रुपये किमतीच्या महागड्या मोटारसायकली हस्तगत करत इगतपुरी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. या गुन्हेगारांकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांना गुप्तबातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून इगतपुरी शहरातील तीन लकडी परिसरात सिद्धार्थ नगर बुद्धविहाराजवळ राहात असलेल्या बंटी गांगुर्डे याचेकडे काही संशयित इसम येऊन थांबलेले आहेत. त्यांचे घराचे जवळ एक बुलेट मोटारसायकल व एक हिरो स्प्लेंडर प्लस नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकली लावलेल्या असल्याचेही सांगण्यात आले. त्यानुसार पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांनी पोलिस उपनिरीक्षक गणेश परदेशीसह पथक तयार करून खात्री केली.

बंटी गांगुर्डे याचे सोबत दोन इसम यांना त्यांचे जवळ असलेल्या विना नंबर मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची चौकशी करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यांनी त्यांची नावे तुषार ऊर्फ बंटी भारत गांगुर्डे (२४), रा. तीन लकडी इगतपुरी, करण रमेश शिंदे (२६) रा. साकला प्लाट एमआयडीसी रोड, ता. जि. परभणी, श्यामसुंदर मनोज गेडाम (२६) रा. गांधीनगर, अदिलाबाद, ता. जि. आदिलाबाद, राज्य-तेलंगणा अशी सांगितली. त्यांचेकडे असलेल्या बुलेट व हिरो स्प्लेंडर मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्या मोटारसायकल चोरीच्या असल्याचे व त्या बंटी गांगुर्डे याचे घराजवळील बंद पडक्या खोलीत लावलेल्या असल्याचीही त्यांनी माहिती दिली. पथकाने खात्री केली असता ५ विना नंबर प्लेट मोटारसायकल आढळून आल्या.

आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
इगतपुरी शहर व ग्रामीण भागातून ३ विनानंबर मोटारसायकली अशा एकूण रॉयल इनफील्ड कंपनीच्या ४ बुलेट, यामाहा कंपनीच्या ४ आर वन फाय, हिरो कंपनीची १ हिरो स्प्लेंडर प्लस, बजाज कंपनीची १ पल्सर अशा १० विना नंबर प्लेट नसलेल्या अंदाजे १५ लाख रुपये किमतीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. सदरच्या मोटारसायकली या छत्रपती संभाजीनगर, नाशिक शहर व इतर ठिकाणाहून चोरी केलेल्या असून आणखीही चोरीच्या मोटारसायकली मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये आणखी काही आरोपी सक्रिय आहेत काय याबाबत चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---