---Advertisement---

नाशिकमध्ये भरदिवसा घरफोडी ; २२ तोळ्यांच्या दागिन्यांसह सहा लाखांचा ऐवज लंपास

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । नाशिकमध्ये एकीकडे गुन्हेगारीने डोकं वर काढले असून यातच चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशोका मार्ग परिसरात भरदिवसा घरफोडी झाली असून यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे सेफ्टी लॉक तसेच लॅच लॉक तोडून २२ तोळ्यांच्या दागिन्यांसह रक्कम असा सुमारे ६ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. भरदिवसा झालेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे अशोका मार्ग परिसरात त भीती पसरली आहे. मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. मृणाल शैलेश काळे (रा. अशोका टॉवरसमोर, अशोका मार्ग) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक चोरट्याने तोडले, घराचा सेफ्टी दरवाजा आणि लॅच लॉकही तोडत प्रवेश केला.

कपाटातील १.११ लाख रुपये किमतीच्या ६० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन पाटल्या, २१ हजार ८१६ रुपयांच्या २४ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन बांगडधा, ७१,२११ रुपये किमतीची १५ ग्रॅमचीसोन्याची एक बांगडी, १,४६,९६० रुपये किमतीच्या ३० ग्रॅमच्या सोन्याच्या दोन बांगड्या, ११, २५० रुपये किमतीचा २५ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, ९६,६०२ रुपये किमतीचे २४ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ६७,२४८ रुपये किमतीचे १८ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ४,५०० रुपये किमतीचा १० ग्रॅमचा लक्ष्मीहार, २२५० रुपये किमतीचे ५ ग्रॅचे झुमके, ८,५६४ रुपये किमतीच्या २.५० ग्रॅमच्या कुड्या, ९१८ रुपयांचे टॉप्स, १७०० रुपये किमतीच्या दोन कुडचा, ४० हजार १६ रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची छोटी घेन, ११८ रुपये किमतीचा १५ ग्रॅम वजनाचा चांदीचा छल्ला, १८ हजार रुपये किमतीचा निकॉन कंपनीचा कॅमेरा व १० हजार रुपये रोख असा एकूण ६ लाख १२ हजार १५३ रुपये किमतीचा ऐवज भरदिवसा घरफोडी करून चोरून नेला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---