---Advertisement---

लासलगावच्या दत्त मंदिरातून चांदीचा मुकुट व राजदंड चोरीला; चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून मागील काही दिवसांमध्ये चोरट्यानी मंदिर लक्ष केल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान लासलगाव येथील श्री दत्त मंदिरातअज्ञात चोरट्याने हातसफाई केली. चोरट्याने मंदिरातून दीडशे ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट व राजदंड चोरून नेला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले

नाशिकच्या लासलगाव येथील श्री दत्त मंदिरातून पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दत्त मंदिराची खिडकी तोडून खिडकीतून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर दत्ताच्या डोक्यावर असलेला अकरा हजार रुपये किमतीच्या दीडशे ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट तसेच चांदीचा असलेला राजदंड चोरून पोबारा केल्याची घटना घडली आहे.

चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
दरम्यान मंदिरात सकाळी काही भाविक दर्शनासाठी आले असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मंदिरात लावलेला सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. यात चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून येत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लासलगाव पोलीस अधिक तपास करत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---