---Advertisement---

पावसाचा कहर ! सिन्नर बसस्थानकाचे छत शिवशाहीसह कारवर कोसळला, सुदैवा जीवितहानी टळली..

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २६ मे २०२५ । राज्यासह नाशिक जिल्ह्यातही सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे. यातच नाशिकच्या सिन्नर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिन्नर बसस्थानकाच्या छताचा पुढचा भाग कोसळला. एका शिवशाहीसह कारवर या छताचा काही भाग काेसळल्याने बस व कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सिन्नरमध्ये रविवारी (दि २५) दुपारी साडेतीनपासून दोन तासांत १४४ मिलिमीटर पाऊस झाला. शहरातील सरस्वती तसेच लगतच्या देव नदीला मे महिन्यातच पूर आला. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे हायटेक बसस्थानक म्हणून संपूर्ण राज्यात मिरवले जाणारे सिन्नर एसटी बसस्थानकाचा स्लॅब एका कारसह बसवर कोसळला

ठाणे आगाराची शिर्डी-ठाणे शिवशाही बस (क्र.एमएच. 09/इएम 3575) नुकतीच आगारात आली हाेती. या बसमध्ये जवळपास २७ प्रवाशी हाेते. त्यांना संकटकालीन मार्गातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अन्य बसने त्यांना ठाण्याकडे रवाना करण्यात आले.

याच दरम्यान कुटुंबातील प्रवाशांना सोडण्यासाठी एकजण कारने (क्र.एमएच 03. एडब्ल्यू/4348) घेऊन बसस्थानकात आला होता. मुसळधार पाऊस सुरु असल्याने चालकाने बसस्थानकाला लागून कार उभी केली होती. यादरम्यानच कारवर छताचा काही भाग कोसळला. सुदैवाने चालकासह कारमधील प्रवाशी उतरुन बसस्थानकात गेले होते. त्यामुळे जिवितहानी टळली पोलिस पथक व सिन्नर नक्षर परिषदेची अग्निशमन यंत्रणा, यांच्यासह विभाग नियंत्रक सोनवणे, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भाेसले, कल्याणी ढगे, आगारप्रमुख हेमंत नेरकर, स्थानकप्रमुख सुरेश पवार, वाहतूक निरीक्षक भरत शेळके, जयवंत चाेपडे व कर्मचारी आदींनी मदतकार्य केले.

छतावर पाणी तुंबल्याने दुर्घटना?
दरम्यान, बसस्थानकाच्या छतावरुन पाणी वाहून जाण्यास पाईप टाकून व्यवस्था करण्यात आलेली आहे. तथापि, छतावरुन वाहून जाणाऱ्या वितरण व्यवस्थेत अडथळा निर्माण झाल्याने पाणी तुंबले असावे. गेली अनेक वर्षे याची देखभाल दुरुस्ती झाली नसावी. त्यामुळे पाणी साचून झिज झालेला छताचा पुढचा भाग वादळी वाèयासह झालेल्या पावसात काेसळला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येतआहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---