---Advertisement---

लहान मुलांना मोबाइलचे लागलेले वेड, मालेगावच्या बोहरा समाजाने शोधला असा उपाय, वाचून कौतुक कराल..

mobile
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । लहान मुलांना मोबाइलचे लागलेले वेड, त्याचे दुष्परिणाम यावर मालेगाव येथील दाऊदी बोहरा समाजाने उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे समाजातील १५ वर्षांच्या आतील मुला-मुलींना मोबाइल न देण्याचा घेतलेला निर्णय.

अल्पवयीन मुले-मुली मोबाइलच्या आहारी गेले असून, त्यांच्यामध्ये शारीरिक व मानसिक विकार दिसून येत आहेत. त्यामुळे स्वतःपासून सुरुवात करीत येथील दाऊदी बोहरा समाजाने पाऊल उचलले आहे. समाजाचे धर्मगुरु डॉ. सय्यद नाम मुफत्तल सैफुउद्दीन यांनी त्याबाबत पुढाकार घेतला.

यासाठी समाजाची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत लहान मुलांना मोबाइलमुळे होणारे डोळ्यांचे आजार, मुलांच्या मनावर होणारे विपरीत परिणाम, त्यांच्यातील शारीरिक कमजोरी आदी विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत डॉ. सय्यद यांनी मुलांना मोबाइल देऊ नये, अशा सूचना केल्या.त्यावर सर्वांनी होकार दर्शवत पंधरा वर्षाच्या आतील मुला-मुलींना मोबाइलला हात लावू द्यायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेऊन न थांबता त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---