---Advertisement---

ठाकरे गटातील गळती थांबेना ; आणखी एका शिलेदाराने ठोकला रामराम..

uddhav thakre
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । कोकणामध्ये (Kokan) ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (ShivSena) जिल्हाप्रमुख संजय पडते (Sanjay Padate) यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा (Resigns) दिला आहे. त्यामुळे ठाकरेंना कोकणामध्ये आणखी एक धक्का बसला आहे.

मागील काही दिवसापासून ठाकरे गटाला गळती लागल्याचं दिसून येत असून एकापाठोपाठ एक दिग्गज नेते उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडत आहेत. काही माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. यांनतर आता सिंधुदुर्गात (Sindhudurga) ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. ‘आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक आणि निष्ठेने न्याय देण्याचे काम केले. सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडीमुळे काम करणे शक्य वाटत नाही. यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देतोय.’, असं त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. दरम्यान संजय पडते हे नेमकं भाजपमध्ये की शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे याची माहिती समोर आली नाही.

अलीकडेच कुडाळमध्ये नगरसेवकांनीही राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर संजय पडते यांचा राजीनामा महत्त्वाचा आणि ठाकरे सेनेला धक्का देणारा मानला जातो.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---