---Advertisement---

नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेला पुन्हा हादरा ; २ दिग्गज नेत्यांसह नगरसेवकांचा आज भाजप प्रवेश

uddhav thakre
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२५ । आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते एकापाठोपाठ उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना दिसत आहेत. अशामध्ये आता नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनी पक्षाला रामराम ठोकला असून ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेक जण सोडून जात असल्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये इनकमिंक सुरू असल्यामुळे नाशिकमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये पुन्हा एकदा मोठा धक्का बसला. ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विलास शिंदे शिवसेना शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्या जागी महानगरप्रमुख म्हणून मामा राजवाडे यांची नियुक्ती झाली होती. अवघ्या ८ दिवसांतच मामा राजवाडे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. सुनिल बागुल आणि मामा राजवाडे यांच्यासह माजी नगरसेवक देखील भाजपात प्रवेश करणार आहेत.

नाशिकमध्ये एका महाराण प्रकरणात सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाच्या या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाशिकमध्ये या दोघांच्याही भाजप प्रवेशाची आता जोरदार चर्चा रंगली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---