---Advertisement---

नाशिकचा पारा घसरला, पण उकाडा कायम ; आज कसे राहणार तापमान?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२५ नाशिक शहराचे कमाल तापमान मागील काही दिवसांपासून वाढले होते. पारा चाळिशीपार स्थिरावत आहे. मात्र, दोन दिवसांपासून तापमानात घट दिसून आली. तापमानाचा पारा घसरला असला तरी सध्या उष्ण व दमट हवामान असल्याने उकाड्याने नाशिककर हैराण झाले आहेत. रविवारी (दि.२०) कमाल तापमान ३७.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. तसेच किमान तापमान २०.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.दरम्यान आज तापमान पुन्हा ४० अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

नाशिकच्या तापमानात चढ उतार दिसून येत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली होती. मात्र यांनतर तापमानात पुन्हा वाढ झाली. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्चातच ४१ अंशांपार पोहोचले होते. यामुळे नागरिक उन्हाने जणू भाजून निघाले होते. वाढत्या उषयासह उकाड्याने जिवाची लाहीलाही होत आहे.

मागच्या दोन तीन दिवसात तापमानात २ ते ३ अंशाने घसरण झाली आहे. सकाळपासून उन्हाची तिव्रता जाणवत असल्याने रस्त्यावर गर्दी कमी दिसून येत होती. शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवस शासकिय सुट्टया असूनही दिवसा गर्दी कमी होती. तर सायंकाळी ५ नंतर रस्ते गर्दीन फुलुन गेले होते. खाद्यपदार्थांच्या दुकानांवर गर्दी होत असल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत होते

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---