---Advertisement---

Nashik Weather : थंडी ओसरली, तापमानाचा पारा वाढणार, नाशिकमध्ये आजपासून 4 दिवस असे राहणार तापमान?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२५ । सध्या राज्यातील अनेक ठिकाणी थंडी आटोपली असल्याचे जाणवत असून तापमानात वाढ झाल्याने दिवसा उकाडा वाढत चालला आहे. अनेक जिल्ह्यांमधील कमाल-किमान तापमान वाढले आहे. दरम्यान, नाशिकमध्ये आगामी तीन ते चार दिवस किमान आणि कमाल तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. Nashik Weather

बुधवारी नाशिकमध्ये किमान तापमान १४.६ तर कमाल ३१.१ होते. तसेच दोन दिवस उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात सकाळी हलक्या प्रमाणात धुके राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात दुपारनंतर वातावरण काहीसे ढगाळ राहणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यात थंडीमध्ये चढउतार जाणवला असून गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात १ अंश सेल्सिअसने घसरण झाली होती. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

नाशिक मध्ये आजपासून ४ दिवस असे राहणार तापमान?
६ फेब्रुवारी : किमान – १४… कमाल – ३२
७ फेब्रुवारी : किमान – १५ … कमाल – ३३
८ फेब्रुवारी : किमान – १६… कमाल – ३४
९ फेब्रुवारी : किमान – १६… कमाल – ३४

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---