नाशिक लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । नाशिकच्या पेठ तालुक्यातील रुई पेठा गावात आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. शोभा भिवसन असं मयत महिलेचं नाव असून मृत महिलेच्या अंगावर अनेक जखमा असल्याचे समोर आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घातपात आहे की अपघात याविषयी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शोभा भिवसन या महिलेला जखमी अवस्थेत नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. महिलेच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या आहेत. ही लाकूड आणण्यासाठी घराबाहेर गेली होती, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. महिलेच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा असल्याने घातपात आहे की अपघात याविषयी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.