---Advertisement---

विद्यार्थी व महाविद्यालयांनी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज तत्काळ सादर करण्याचे आवाहन

cast
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विना अनुदानित व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेले अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व एसईबीसी (सामाजिकदृष्ट्या मागास मराठा प्रवर्ग) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी जात वैधतेचे अर्ज समिती कार्यालयास तत्काळ सादर करावेत, असे आवाहन जात पडताळणी समितीचे उपायुक्त राकेश पाटील यांनी झूम वेबिनारमध्ये केले आहे, अशी माहिती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव योगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील उच्च व तंत्रशिक्षणांतर्गत व्यावसायकि अभ्यासक्रमच्या सीईटी प्रक्रियेनुसार प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेल्या 100 दिवस उद्दीष्ट कार्यक्रमानुसार 7 कलमी कृती आराखड्यान्वये या विद्यार्थ्यांसाठी झूम वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विना अनुदानित व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य / मुख्यध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती पिंगळकर उपस्थित होते.

बैठकीत संशोधन अधिकारी श्री. पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विषयक अर्ज सीईटीचा अर्ज भरल्यानंतर त्वरीत सादर करावा जेणेकरून प्रवेशापूर्वी प्रमाणपत्राचे वितरण करणे शक्य होणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---