---Advertisement---

Nashik : कारच्या धडकेत जखमी झालेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, दहावीत मिळविले होते 92 टक्के गुण

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमध्ये अपघाताच्या घटना काही केल्या कमी होत नसून अशातच भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अनुष्का शांताराम निमसे असे विद्यार्थिनीची नाव असून, तिने नुकतेच दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले होते.

अनुष्का ही वडिलांसोबत सोबत गुरुवारी (दि.२२) रोजी सायंकाळी कोणार्क नगर परिसरात किराणा माल खरेदीसाठी गेली होती. यानंतर घरी परताना जत्रा चौक – नांदुरू नाका लिंक रोडवर मागून आलेल्या कारने धडक मारली होती.

या धडकेत शांताराम निमसे व अनुष्का हे दोघेजण दुचाकीवरून खाली पडले. शांताराम निमसे यांच्या उजव्या खांद्याला, कमरेला व डोक्यास मार लागुन दुखापत झाली. तसेच मुलगी अनुष्काच्या डोक्यास, हातास आणि दोन्ही पायांना मार लागून गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर मात्र कार चालक फरार झाला असून या वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्याचे काम सुरू आहे.

अपघातातील दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अनुष्काचा रविवारी (दि.२५) मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई, वडील आणि लहान बहीण असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सायंकाळी तिच्यावर नांदूर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---