नाशिक लाईव्ह न्यूज । १२ मे २०२५ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. दहावीचा निकाल उद्या म्हणजेच १३ मे रोजी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.
काही दिवसापूर्वी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. यांनतर दहावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले होते. अनेक अंदाज आणि संभाव्य तारखाही समोर येत होत्या. बोर्डाकडूनही अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. मात्र अशातच आता बोर्डाने परीक्षेची तारीखच जाहीर केली.
उद्या १३ मे रोजी दहावीचा निकाल लागणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता मंडळाचे अध्यक्ष पत्रकार परिषदेत निकालाची औपचारिक घोषणा करतील. त्यानंतर दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत निर्णायक असणार असून त्यानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.
कुठे पाहाल निकाल?
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन
दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजच्या खेटी घालाव्या लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे