नाशिक लाईव्ह न्यूज । लासलगाव येथील प्राणी फाउंडेशनच्या गोरक्षक पथकाने उंबरठाण (ता. सुरगाणा) येथे क्रूरपणे दोरखंडात जखडून कत्तलीसाठी मालेगावला घेऊन जाणाऱ्या अन् किराणा माल वाहतुकीचा देखावा करणाऱ्या एका पिकअपचा पाठलाग केला. अभोणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोसवन शिवारात सहा गायींना जीवदान दिल्याने गो प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, गो तस्करांचा उच्छाद वाढल्याने धार्मिक प्रवृतीच्या अभोणा गावाला कुप्रसिध्दीचा शिक्का बसला आहे.
कळवण – सुरगाणा तालुक्यात गो तस्करीने हैदोस घातला आहे. सरकारने गायीला राज्य मातेचा दर्जा दिला आहे. पण सुरक्षेची जबाबदारी रामभरोसे सोडल्याचे दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या तालुक्यातील मध्यवर्ती अभोणा गावात गो तस्करीचे सेंटर असून परिसरातील खेडे गावांत त्यांचे एजेंट सक्रीय आहेत. पोलिसांनी गो तस्करीची गाडी पकडली तर विचित्र चित्र दिसते. गोरक्षकच गाडी सोडण्यासाठी मध्यस्थी करत असल्याने गो तस्करांना पाठबळ मिळते. गो तस्करीच्या धंद्याविरोधात सर्वसामान्य जनता आवाज उठवत आहे. सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथून पिकअप (एमएच २० इएल १८४८) वाहनातून मालेगावी कत्तलीसाठी सहा गायी घेऊन जात असल्याची माहिती प्राणिन फाउंडेशनच्या पथकास मिळाली. त्यांनी कोसवन जामुनपाडा शिवारात गाडी अडवली.
चालक व गो तस्कर पळून गेले. या वाहनात सहा गायी कत्तलीसाठी नेल्या जात होत्या. संशय येऊ नये यासाठी रिकाम्या गोण्यांत भुसा भरत गार्थीवर ठेवल्या होत्या. मागे तेलाचे डबे ठेवले होते. प्राणिन फाउंडेशनच्या नेल्या जात होत्या. संशय येऊ नये यासाठी रिकाम्या गोण्यांत भुसा भरत गायींवर ठेवल्या होत्या. मागे तेलाचे डबे ठेवले होते. प्राणिन फाउंडेशनच्या गोरक्षकांनी किराणा देखावा काढत त्याखाली लपवलेल्या गायींना जीवदान दिले. गायींची वैद्यकीय तपासणी करत वणीच्या गोशाळेत पोहोचवले. याकामी स्थानिकांनी पोलिस व गोरक्षकांना सहकार्य केले. पिकअप वाहनासह ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक पोलिस निरीक्षक यशवंत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नवनाथ रसाळ तपास करत आहे.