---Advertisement---

मालेगावात गावठी दारूच्या सहा हातभट्ट्या उद्ध्वस्त

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२५ । एकीकडे नाशिकमध्ये गुन्हेगारी डोकं वर काढत असून यातच अवैध धंद्यांना ऊत आला आहे. याच दरम्यान मालेगाव छावणी पोलिसांनी गावठी दारू निर्मितीच्या हातभट्ट्यांवर छापे टाकले. ग्रामीण भागात सुरू असलेल्या सहा हातभट्ट्या उद्ध्वस्त करत १० हजार रुपये किमतीची १०० लिटर गावठी दारू जप्त केली.

कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावठी दारुची चोरट्या पद्धतीने निर्मिती करत त्याची शहरात छुपी विक्री केली जात आहे. या अवैधधंद्यांमुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे. बहुतांश तरुण दारुच्या आहारी गेल्याने त्यांचे आयुष्य बरबाद होत आहे. मद्याच्या नशेत अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे घडत आहे. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी अवैध धंद्यांवर धडक कारवायांचे आदेश दिले आहे.

त्यानुसार सहाय्यक पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलिसांनी हद्दीतील दुर्गम भागांत छापे टाकले. सहा ठिकाणी गावठी बनावटीची सुमारे १० हजार रुपये किमतीची १०० लिटर दारू आढळून आली. पोलिसांनी दारू जप्त करत चोरटी निर्मिती व विक्री करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सहा स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---