नाशिक लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२५ । नाशिकमध्ये अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसला सिन्नर तालुक्यातील दोडी गावाजवळ अपघात झाल्याची घटना रात्री घडली. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी चालकान बस रस्त्याच्या डाव्या बाजूला नेली.
मात्र रस्त्यावर अंधार असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने बस जागीच पलटी झाली आहे. या घटनेत 13 प्रवासी आणि वाहक असे 14 जण जखमी झाले होते. त्यातील पाच जणांवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. तर इतर किरकोळ जखमी होते त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आले आहे.