---Advertisement---

नाशिकमध्ये शिंदे गटाचा काँग्रेस आणि ठाकरे गटाला धक्का ; मध्यरात्री शिवसेनेत प्रवेश

hemlata patil
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मध्य नाशिकची जागा ठाकरे गटाला सोडल्याने नाराज असलेल्या काँग्रेस सरचिटणीस आणि प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील (Dr Hemlata Patil) यांनी मंगळवारी रात्री दिल्ली येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shiv Sena) जाहीर प्रवेश केला. या घटनेने काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्याचा शिवसेनेत प्रवेश
डॉ. हेमलता पाटील या १९९६ मध्ये महापालिकेच्या पोटनिवडणुकीत अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून प्रदेश प्रवक्ता म्हणून कार्यरत होत्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी मिळून त्यांनी भाजप आमदार देवयानी फरांदे यांना चांगली टक्कर दिली होती, परंतु नुकत्याच झालेल्या यंदाचं विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देऊन ती जागा ठाकरे गटाचे नेते वसंत गीते यांना दिली गेल्याने त्या नाराज होत्या. या निवडणुकीत ठाकरे गटाने एबी फॉर्म देऊनही आपली उमेदवारी हिसकावून घेतली असा आरोप त्यांनी केला होता, ज्यामुळे त्यांनी काही दिवसातच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.

अन्य नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
नाशिकच्या माजी उपमहापौर तसेच सहा वेळा नगरसेवक राहिलेल्या ठाकरे गटाच्या रंजना बोराडे आणि माजी नगरसेवक दीपक दातीर यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात असून, अजून कोणकोणते ऑपरेशन केले जातील याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.

राजकीय परिणाम
या घटनेमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीत असताना हा पक्षप्रवेश करून शिंदेनी काँग्रेसला धक्का दिला आहे. या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---