---Advertisement---

सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात तेजी ; सेन्सेक्स- निफ्टीत मोठी वाढ

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । भारतीय शेअर बाजारात आज, २१ मार्च रोजी सलग पाचव्या दिवशी प्रचंड वाढ झाली. सेन्सेक्स (Sensex) ५५७ अंकांनी वाढून ७६,९०५ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty) १५९ अंकांच्या वाढीसह २३,३५० वर स्थिरावला.

गेल्या काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदार धास्तावले होते. मात्र या आठवड्यात शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आलीय. आज पुन्हा शेअर बाजारात तेजी दिसून आली. परदेशी निधीचा नवीन प्रवाह आणि बँकांच्या शेअरमध्ये वाढ यामुळे बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी दिसून आली.

सेन्सेक्स- निफ्टीची आज कमकुवत सुरुवात झाली होती. पण परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री कमी करुन खरेदीवर जोर दिल्याच्या आशावादामुळे दोन्ही निर्देशांकांनी तेजीच्या दिशेने चाल केली. आज सेन्सेक्स ५५७.४५ अंकांनी किंवा ०.७३ टक्क्यांनी वाढून ७६,९०५.५१ वर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान, तो ६९३.८८ अंकांनी किंवा ०.९० टक्क्यांनी वाढून ७७,०४१.९४ अंकांवर पोहोचला. एनएसई निफ्टी १५९.७५ अंकांनी किंवा ०.६९ टक्क्यांनी वाढून २३,३५०.४० वर पोहोचला

कोणते शेअर्स वाढले?
सेन्सेक्सवर एनटीपीसी, बजाज फायनान्स, कोटक बँक, नेस्ले इंडिया, सन फार्मा, टाटा मोटर्स, एलटी, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड हे शेअर्स १ ते ३ टक्के वाढले. तर इन्फोसिस, एम अँड एम, टाटा स्टील, टायटन हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले.

कालचा बाजार कसा होता?
गुरुवारी, बीएसई बेंचमार्क ८९९.०१ अंकांनी किंवा १.१९ टक्क्यांनी वाढून ७६,३४८.०६ वर बंद झाला. अशाप्रकारे सेन्सेक्सने ७६,००० ची पातळी परत मिळवली. त्याचप्रमाणे, निफ्टीने २८३.०५ अंकांनी किंवा १.२४ टक्के वाढ करून २३,००० अंक गाठला आणि तो २३,१९०.६५ अंकांवर बंद झाला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---