---Advertisement---

ब्लॅक मंडे ! शेअर बाजरात ५ वर्षातील सर्वात मोठी घसरण

share market
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२५ । कोरोना महामारीनंतर आज सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स ३००० हजाराहून अधिक अंकांनी घसरली तर निफ्टी १००० अंकांनी कोसळले. या घसरणीमागील कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे बाजारात हाहाकार उडाला.

आज सोमवारी भारतीय शेअर बाजारात गेल्या ५ वर्षातील सर्वात मोठी घसरण दिसून आली. प्री-ओपनिंगमध्ये जवळपास ४००० अंकांची घसरण झाल्यानंतर, सेन्सेक्स ३००० अंकांच्या घसरणीसह उघडला आहे. सकाळी ९.३० वाजता, सेन्सेक्स २६१० अंकांच्या मोठ्या घसरणीसह ७२७४१ अंकांवर व्यवहार करत होता. मार्च आणि एप्रिल २०२० नंतर कोरोना काळात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. शेअर बाजारातील या त्सुनामीमुळे गुंतवणूकदारांचे १८ लाख कोटी रुपये बुडाले. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप एका मिनिटात १८ लाख कोटी रुपयांनी घसरले. शेअर बाजारातील हा ट्रेंड दिवसभर कायम राहिल्यास भारतीय गुंतवणुकदारांना खूप मोठे नुकसान सोसावे लागेल.

दरम्यान, सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि त्याचा परिणाम शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. ही घसरण फक्त भारतामध्येच नाही तर आशियाई बाजारपेठेत दिसून आली. आशियाई शेअरबाजारात सरासरी ९ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. हाँगकाँग, चीनसह सर्वच शेअर शेअर बाजारात कोट्यवधि रूपयांची राखरांगोळी झाली.

शेअर बाजरातील या पडझडीत आयटी कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. जवळपास सर्व आयटी कंपन्यांच्या समभागांची किंमत मोठ्याप्रमाणावर घसरली आहे. तर टाटा मोटर्सचे समभाग 9 टक्क्यांनी गडगडले आहेत. टाटा मोटर्सच्या जग्वार लँड रोव्हरने (जेएलआर) एप्रिलसाठी अमेरिकेत वाहनांची शिपमेंट तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली होती. ही टाटा मोटर्सची उपकंपनी असल्याने टाटा मोटर्सच्या समभागात घसरण पाहायला मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---