नाशिक लाईव्ह न्यूज । राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू विधान परिषदेमध्ये आज शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या जोरदार खडाजंगी झाली. चिडलेल्या अनिल परब यांनी शंभूराज देसाईंना गद्दार असं संबोधलं. ज्यानंतर शंभूराज देसाईंनी गद्दार कुणाला म्हणतो रे? बाहेर भेट मी बघतो असं करत अनिल परब यांना ललकारलं होतं. हा वाद इतका वाढला की विधान परिषदेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मराठी माणसाला मुंबईत हक्काचं घर देण्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी अनिल परब यांनी मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी 40 टक्क्यांची अट टाकून कायदा आणणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी 2019-2022 दरम्यान सरकार असताना तुम्ही का केलं नाही? अशी विचारणा केली.
त्यावर शंभूराज देसाई त्यांना उपहासात्मकपणे म्हणाले, तुम्ही केलं नाही हे रेकॉर्डवर येतं हे ऐकवत नाही का? तुम्ही करु शकला नाही. तुमचं पुतणा मावशीचं प्रेम आहे. यांना इतकं झोंबवण्याचं कारण काय आहे? आपण केलं नाही हे स्विकारा. मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आणि वरवरचं आहे हे दिसू द्या”.
शंभूराज देसाईंनी यानंतर आता मला वेळ द्या असं सांगत बोलण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान अनिल परब आणि इतर आमदार गदारोळ घालत होते. त्यावेळी अनिल परब यांनी त्यांना गद्दार म्हटल्याने संतापले. “मी काय करत होतो सांगू का? कोणाला गद्दार म्हणतो. बाहेर ये तुला दाखवतो”, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला.