---Advertisement---

शरण जाण्यापूर्वीच ‘खोक्या’च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; प्रयागराजमधून केली अटक

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२५ । बीडमध्ये ढाकणे पिता-पुत्रांना अमानुषपणे मारहाण करणारा भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थक आरोपी सतीश भोसले उर्फ ‘खोक्या भाई ‘च्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. त्याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश भोसले आज स्वतः पोलिसांना शरण जाणार होता. मात्र त्यापूर्वीच बीड पोलीस आणि प्रयागराज पोली यांच्या माध्यमातून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रयागराजहून सतीश भोसलेला बीडकडे आणले जात आहे.

खोक्या भाईचे कारनामे काय होते?
बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला सतीश भोसले याने अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सतीश भोसले याचे पैशांचे बंडल फेकणे, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात हत्यारे, शिकारीसाठी लागणारे जाळे आणि इतर साहित्य मिळाले होते. दरम्यान, खोक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासूनच पोलीस या खोक्या भाईच्या मागावर होते.

सतीश भोसले हा पोलिसांना शरण येणार असल्याची चर्चा सुरु होती. पण त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सतीश भोसले ऊर्फ खोक्या याच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---