नाशिक लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२५ । बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संदर्भाची लाट पसरली आहे. याचे तीव्र पडसाद नाशिक मध्ये देखील उमटायला सुरुवात झाली
नाशिकमध्ये आज संभाजी ब्रिगेडने अनोखं आंदोलन केलं. संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहरातील सुलभ शौचालयामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याचे फोटो लावून मूत्रविसर्जन आंदोलन केलय. या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विरोधातही रोष व्यक्त करत कारवाईची मागणी केली.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सरकारवर रोष व्यक्त करत म्हटले की, धनंजय मुंडे यांना देखील सरपंच संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात सहआरोपी केले जावे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे राजकीय भविष्य काय असेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अनेक राजकीय तज्ज्ञ आणि विरोधक यावर भाष्य करत असून, त्यांची आमदारकी कायम राहणार की रद्द होणार, याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत