---Advertisement---

नाशिक जिल्ह्यात 2024 मध्ये झाली ‘इतक्या’ लीटर वाईनची विक्री..

wine
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २०२४ मध्ये भारतात सव्वा तीन कोटी लीटर वाईन (Wine) उत्पादन झालं, ज्यात सर्वाधिक ९० टक्के वाटा हा महाराष्ट्राचा असून विशेषतः नाशिकचा (Nashik) आहे. देशभरात वाईनच्या विक्रीत २०२३-२४ या एका वर्षांत १०.४० टक्के इतकी वाढ झाली. २०२२-२३ मध्ये २ कोटी ७४ लाख २९ हजार ०१३ लीटर वाईनची विक्री झाली होती. २०२३-२४ मध्ये ती ३ कोटी ०२ लाख ८४ हजार ३५४ लीटर इतकी झाली आहे.

नैसर्गिक आपत्तींना तोड देणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासनाने वाईन उद्योगांना चालना दिली. त्यामुळे नाशिक, पुणे आणि सांगली जिल्ह्यात वाईन उत्पादन सुरु झाले. एकट्या नाशिक जिल्ह्यात तब्बल ५३ वाइनरी उभारण्यात आल्या. मात्र शासनाच्या बदलत्या अटी व धोरणांमुळे त्यातील १५ ते २० प्रकल्प बंद झाले. ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांनी मात्र वाईन निर्मिती सुरु ठेवली. त्यामुळे देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार झाला.

नाशिक जिल्ह्यामध्येही रेड आणि व्हाईट वाईनचे उत्पादन व त्यास मागणी वाढली. २०२४ मध्ये तब्बल ३ कोटी २ लाख ८४ हजार ३५४ लीटर वाईनची विक्री झाली. त्यातील ७ ते ८ टक्के परदेशात निर्यात झाली. वाईन निर्यातीवर शुल्क अधिक असल्याने उत्पादनाच्या तुलनेत निर्यात कमी असल्याचे उत्पादक सांगतात.

उत्पादनात विविध प्रयोग
नाशिक जिल्ह्यात वाईनमध्ये विविध प्रकारचे प्रयोग केले जात असल्याने रेड, व्हाईट वाईनसोबतच मध, जांभूळ, सफरचंद, आंबा, करवंद यापासून वाईन तयार केली जाते. या उद्योगात तरुणींचा सहभाग अधिक असल्याने त्यांना रोजगाराची चांगली संधी प्राप्त होत आहे. वाइनचा वापर इतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठीही होत असल्याने मागणी वाढली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---