---Advertisement---

देवळाली कॅम्प परिसरात जवानाच्या घरी दरोडा

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २५ मे २०२५ । नाशिकमध्ये घरफोडी, खून, दरोड्यासह खंडणीच्या घटना वाढत असल्याचं दिसत आहे. यातच नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात जवानाच्या घरी भर दुपारी दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या देवळाली कॅम्प छावणीच्या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी जवानांना तोफ गोळ्यांचा प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हा संपूर्ण कॅम्प परिसर अतिशय सुरक्षित मानला जातो. मात्र शुक्रवारी दुपारी कॅम्प परिसरात जवानांसाठी बांधण्यात आलेल्या कारगिल ईनक्लेव्ह बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यामध्ये एका जवानाच्या पत्नी लहान मुलांसोबत घरी असताना संशयित आरोपी घरी पाण्याचा प्रेशर चेक करण्याच्या बहाणा करून घरात प्रवेश केला.

घरातील नळ चेक करून महिलेचे लक्ष विचलित केले. यानंतर जवानाच्या पत्नी आणि लहान मुलाला धमकी देत घरातील आणि महिलेने परिधान केलेले अंगात असलेल्या जवळपास ४ लाखांचे दागिने घेत महिलेला चापट मारली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देवून अर्धनग्न अवस्थेत मोबाईलमध्ये फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देऊन घरातून निघून गेला. त्यामुळे जवानांचे कुटुंब प्रचंड घाबरले होते.

दरम्यान जवान कामाहून रात्री घरी आले असता पत्नीने घाबरत घाबरत घडलेली घटना सांगितली. यानंतर जवानाने पत्नी आणि मुलाला घेऊन देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्र तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---