नाशिक लाईव्ह न्यूज । २५ जून २०२५ । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता काही विशेष गाड्यांच्या सेवेत वाढ केली. अशातच रेल्वेने रिवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) या विशेष गाडीच्या सेवेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक ०२१८७ रिवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष गाडी ३ जुलैपर्यंत धावणार होती. आता ती २५ सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) – रिवा साप्ताहिक विशेष गाडी, अधिसूचित दि. ४ जुलैपर्यंत होती. आता २६ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाडीची वेळ वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही.
या स्थानकावर आहे थांबा?
सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंहपूर, गदरवाडा, पिपरिया, इटारसी जंक्शन, हरदा, खांडवा, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, दादर या स्थानकावर थांबा आहे.








