---Advertisement---

नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२५ । विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गळती रोखण्यासाठी संजय राऊत यांनी नाशिकची चक्रे फिरवली आहेत. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल करण्यात आले आहे.

जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची उपनेतेपदी बढती करण्यात आली आहे. तर माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच ते पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यांनी त्याचवेळी फेरबदलाचे संकेत दिले होते. लोकसभा निवडणुकीत ठाकरे सेनेला नाशिकमध्ये मोठे यश मिळाले. ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचा पराभव केला. ठाकरे सेनेच्या या विजयात बडगुजर यांचा मोठा वाटा आहे, पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची बढती केली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---