---Advertisement---

राज ठाकरेंचा नाशिक दौरा रद्द

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यांनतर राज्यातील सर्वच पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. नाशिकमध्येही मनसेने तयारी सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येणार होते. मात्र राज ठाकरेंचा नाशिक दौरा रद्द झाला.

या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांची नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार होती. या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा हा दौरा रद्द झाला. दरम्यान या दौऱ्या रद्द मागील कारण समजू शकले नाही .

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---