---Advertisement---

आगामी निवडणुकीच्या पुनर्बाधणीसाठी राज ठाकरे मैदानात ! दोन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकणार

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १३ मे २०२५ । आगामी महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. नाशिक महानगपालिका निवडणूक हे मनसेचे महत्वाचे मिशन असणार आहे. त्यादृष्टीने राज ठाकरे स्वत: नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. १५ व १६ मे असे दोन दिवस ते नाशिकमध्ये मुक्काम ठोकणार आहे. यात नाशिक मनपा निवडणुकीची रणनिती आखण्याची शक्यता आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आल्यास त्याचा नाशिक महापालिका निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांच्याकडे आजूनही नाशिकमध्ये काही प्रमाणात संघटना अस्तित्वात आहे, अशात मनसे सोबत आल्यास महायुतीला ते आव्हान देऊ शकतात. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पुनर्बाधणीसाठी राज ठाकरे रिंगणात उतरले असून १५ व १६ मे अर्थातच गुरुवारी व शुक्रवारी ते नाशिकमध्ये तळ ठोकणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---