---Advertisement---

80000 पगार, तरी लाच मागितली ; रायपूरचा मंडल अधिकारी नाशिक एसीबीच्या जाळ्यात..

lach
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यातच नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना तालुक्यातील रायपूर येथील मंडल अधिकारी प्रवीण गणपत प्रसाद (५७) यास रंगेहात अटक केली. सदर मंडल अधिकाऱ्यास सुमारे ८० हजार रुपये पगार होता. तरी लाच घेतली.

प्रसाद याच्याकडे रायपूरसह वाकी खुर्द, तळेगावरोही, वाहेगावसाळ, गंगावे या सजांचा कार्यभार आहे. तक्रारदार यांनी काळखोडे येथे जमीन खरेदी केली होती. त्याची सातबारामध्ये नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी वाकी खुर्दच्या तलाठ्यांकडे अर्ज सादर केलेला होता. सदर अर्ज मंजुरीसाठी प्रसाद याच्याकडे आला होता. या प्रकरणाच्या चौकशीच्या अनुषंगाने तक्रारदार १२ फेब्रुवारी रोजी प्रसाद याच्याकडे विचारणा करण्यास गेले असता त्याने तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. गुरुवारी (दि. १३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तडजोडीअंती दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रसाद यास रंगेहाथ अटक केली. चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमोल वालझाडे, हवालदार संदीप हांडगे, विनोद पवार, सुरेश चव्हाण यांच्या पथकाने केली. दरम्यान, सदर मंडल अधिकाऱ्याविरोधात लाचेबाबत अनेकजणांच्या तक्रारी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---