---Advertisement---

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, पुढचे दोन तीन दिवस महत्वाचे; नाशिकला अलर्ट

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२५ । राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कायम आहे. नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान अशातच अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात पुढील दोन तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज नाशिकसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण ? जाणून घ्या
५ जुलै रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर तसेच नाशिक ,पुणे, सातारा व कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तर मुंबई,नंदुरबार, धुळे ,जळगाव,छत्रपती संभाजीनगर ,जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ६ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि कोल्हापूर, सातारा, नाशिकच्या घाटमाथ्यावरही तुफान पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.

बीड ,नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार,वर्धा ,नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ७ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, रायगड,भंडारा गोंदिया,नाशिक व साताऱ्याचा घाटमाथा या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे ,पालघर, नाशिक, नंदुरबार ,धुळे ,जळगाव ,छत्रपती संभाजीनगर, जालना ,परभणी, हिंगोली, नांदेड,नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे यलो अलर्ट जरी केला आहे.

८ जुलै रोजी रत्नागिरी, गोंदिया व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, रायगड सिंधुदुर्ग नागपूर ,भंडारा, चंद्रपूर ,गडचिरोली,तसेच कोल्हापूर व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट आहे. ९ जुलै रोजी तळ कोकणासह पुढे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरील पावसाचा येलो अलर्ट,नागपूर भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचाही समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---