---Advertisement---

देवळ्यातील हॉटेल वेलकममध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी केली मोठी कारवाई

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । देवळा पोलीस ठाणे हद्दीतील मालेगाव रोडजवळील हॉटेल वेलकममध्ये गुप्त माहितीनुसार वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या पथकाने हॉटेल वेलकमवर कारवाई करत दोन पिडीत महिलांना ताब्यात घेत हॉटेल मॅनेजर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल झालेल्या गुन्ह्यातील पिडीत महिला या बांग्लादेशी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांनी दिली. या महिलांविरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल वेलकम येथे हॉटेल मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे (रा. देवळा) हा हॉटेलवर गरजू महिलांना पैशाचे आमीष दाखवुन स्व:ताच्या अर्थिक फायद्यासाठी वळजबरीने वेश्याव्यवसाय करुन घेत आहे. अशी माहीती अप्पर पोलीस अधिक्षकांना मिळाली होती. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या पीडित महिला बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना बळावला असल्याने त्यांची सखोल केली. यामध्ये दोन्ही पीडित महिला बांगला देशी असल्याचच्या पोलीस तपासत निष्पन्न झाले आहे.

या महिलांना पोलिसांनी सोमवारी (दि.24) रोजी कळवण न्यायालयासमोर उभे केले असता सदर महिला लपवुन छपून अनधिकृत पणे भारताच्या सरहद्दीवरील गस्ती पथकाची नजर चुकवुन व मुलखी अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय, वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय किंवा भारत सरकारने अथवा भारतिय सीमेवरील नोंदणी अधिकाऱ्यांनी नेमुन दिलेल्या मार्गाव्यतीरिक्त घुसखोरीच्या मार्गाने भारतिय सरहद्दीत प्रवेश करुन मिळुन आल्या. त्यांच्या विरुद्ध परकिय नागरीक आदेश 1948 सह कलम 14 परकिय नागरीक आदेश 1946 नुसार कायदेशिर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सदर महिलांना अटक करण्यात येणार आहे. यातील मुख्य आरोपी हॉटेल मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे (रा. देवळा) याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदेर्शनाखाली सुरु आहे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---