---Advertisement---

संतापजनक ! नाशिकमध्ये प्राचार्याकडून चार विद्यार्थीनीचा विनयभंग

crime rape
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १ जून २०२५ । महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचारच्या घटना प्रचंड वाढल्या असून यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. अशातच नाशिकमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. ज्यात नाशिकमधील नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्याने चार विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. प्रवीण रमेश घोलप (वय ४०) असे संशयित आरोपी प्राचार्याचे नाव आहे.याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राचार्याला अटक करण्यात आलीय.

नाशिक शहरातील एका नामांकित नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्याविरोधात कॉलेजमधील ४ विद्यार्थिनीने विनयभंगाचा गंभीर आरोप केला. पीडित मुलगी ५ ऑगस्ट २०२४ पासून २९ मे २०२५ पर्यंत द्वारका सर्कल येथील एका कॉलेज ऑफ नर्सिंग येथे शिक्षण घेत होती. या काळात प्राचार्य प्रवीण घोलप यांनी वारंवार पीडितेस त्रास देत शारीरिक संबंधांची मागणी केली. तिच्या खांद्यावर, छातीवर आणि पाठीवर हात फिरवला. तसेच हात हातात घेऊन अश्लील स्पर्श केला. त्याने पीडितेची साडी ओढण्याचा प्रयत्न करत अश्लील नजरेने पाहून तिचा विनयभंग केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

ही धक्कादायक घटना घडली त्या वेळेस पीडिता अतिशय घाबरलेली होती. तिच्या अन्य मैत्रीण बरोबरही असाच प्रकार घडला असल्याची माहिती तिला समजली. त्यानंतर पीडित मुलीने हिम्मत करत भद्रकाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करून संशयित प्रवीण रमेश घोलप (वय ४०) याला अटक केली. गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव करत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---