---Advertisement---

नाशिकच्या ज्वेलर्स दुकानावर दरोडा; एकाला पकडण्यात पोलिसांना यश, लाखोंचा मुद्देमाल जप्त

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक शहरात अंबड पोलीस ठाणे हद्दीत श्री. ज्वेलर्स नावाच्या दुकानात तीन अज्ञात इसमांनी घुसून सराफ दुकानदारास बंदुकीचा धाक दाखवुन त्यांच्याकडे असलेल्या सोन्याचे दागिने घेवून पसार झाले होते. या घटनेने सराफ व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान या दरोड्यातील तिघांपैकी एकाला बेड्या ठोकण्यास गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला यश आले

नीलेश उर्फ शुभम बेलदार (२५, रा.दत्तनगर, चुंचाळे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून साडे चार तोळे सोने व साडे सहा तोळे चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

नेमकी घटना काय?
अंबड पोलिस ठाणे हद्दीतील महालक्ष्मीनगर भागातील एका सराफी दुकानात दोघे दरोडेखोर तोंडाला रूमाल बांधून शिरले. त्यांनी गावठी पिस्तूलचा धाक दाखवून दागिने लुटून पळ काढला होता. वरिष्ठ पोलिस निरिक्षक मधुकर कड यांनी दोन तपास पथके तयार करून दरोडेखोरांचा माग काढण्याचा आदेश दिला होता. गोपनीय माहिती नुसार पथकाने सिन्नरफाटा येथे सापळा रचला. तेथे बेलदार हा गुन्ह्यातील बुलेट दुचाकीने आला असता पथकाने शिताफीने त्यास ताब्यात घेतले.

दोन पथके मागावर
बेलदार याच्यावर यापूर्वीही सातपूर येथे मोबाइल चोरीचा एक गुन्हा दाखल आहे. त्याने त्याच्या आणखी दोन साथीदारांच्या मदतीने सराफी दुकान लुटले. त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून परिस्थिती जेमतेम असल्याचे पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले. त्याचे साथीदारदेखील निष्पन्न झाले असून दोन पथके त्यांच्या मागावर खाना करण्यात आल्याचे कड म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---