---Advertisement---

PNB Bharti : पंजाब नॅशनल बँकेत तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ३५० रिक्त जागा, पात्रता जाणून घ्या..

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । अनेक तरुण तरुणी बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात, अशा इच्छुकांसाठी बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आली आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) ने स्पेशलिस्ट ऑफिसर भरती २०२५ साठी तरुणांकडून अर्ज मागवले आहेत.त्यामुळे चांगल्या सरकारी बँकेत ऑफिसर होण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. PNB Bharti 2025

या नोकरीसाठी तुम्ही pnbindia.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीद्वारे एकूण ३५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२५ आहे. PNB Recruitment 2025

कोणत्या पदासाठी किती जागा भरल्या जाणार?
१) क्रेडिट ऑफिसर – २५० पदे
२) उद्योग अधिकारी – ७५ पदे
३) मॅनेजर-आयटी – ५ पदे
४) वरिष्ठ व्यवस्थापक – आयटी – ५ पदे
५) मॅनेजर डेटा सायंटिस्ट – ३ पदे
६) वरिष्ठ व्यवस्थापक डेटा सायंटिस्ट – २ पदे
७) सायबर सुरक्षा व्यवस्थापक – ५ पदे
८) वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा – ५ पदे
शैक्षणिक पात्रता : अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात बीई/बी.टेकमध्ये किमान ६०% गुण मिळवलेले असावेत.

या नोकरीसाठी २१ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ११८० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५९ शुल्क मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरु शकतात.

इतका पगार मिळेल?
पंजाब नॅशनल बँकेत क्रेडिट ऑफिसर पदासाठी ४८४८० ते ८५९२० रुपये पगार मिळणार आहे. इंडस्ट्री ऑफिसर पदासाठी ४८,४८० ते ८५,९२० रुपये पगार मिळणार आहे.सिनियर मॅनेजर डेटा सायंटिस्ट पदासाठी ८५,९२० ते १,०५,२८० रुपये पगार मिळणार आहे. सिनियर मॅनेजर पदासाठी ८५,९२० ते १,०५,२८० रुपये पगार मिळणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---