---Advertisement---

Nashik : .. तो सामना आयुष्यातील शेवटचा ठरला ; मैदानावरच क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमधील देवळा (Devla) तालुक्यातील दहिवड (Dahivad) गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे. क्रिकेट सामना सुरु असताना मैदानावरच हृदयविकाराच्या झटक्याने 24 वर्षीय क्रिकेटपटू यश सुनील अहिरे याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामुळे त्याच्यासाठी हा सामना अंतिम ठरला आहे.

यश सुनील अहिरे हा आरंभ ऑनलाइन सर्विसेस’चे संचालक होता त्याच्या आकस्मिक मृत्यू झाल्याने गावात आणि तालुक्यात शोककळा पसरली आहे. देवळा तालुक्यात एका महत्त्वपूर्ण क्रिकेट सामना सुरु असताना यश अहिरे हा आपल्या संघासाठी खेळत होता. फलंदाजी करत त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. मात्र, दुर्दैवाने तो सामना त्याच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.

सामन्यादरम्यान यशने आत्मविश्वासाने फटकेबाजी करत आपली चमक दाखवली. यशची फलंदाजी सुरु असताना उपस्थित प्रेक्षकांनी देखील त्याच्या खेळाला जोरदार प्रतिसाद दिला. मात्र, तो बाद झाल्यानंतर मैदानाबाहेर बसल्यानंतर त्याला प्रकृती अस्वस्थ वाटू लागली. मित्रांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सोशल मीडियावर त्याच्या शेवटच्या सामन्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे प्रत्येक जण भावूक होत आहे. यशने गावकऱ्यांना विविध ऑनलाईन सेवा पुरवून अनेकांची कामे सुलभ केली होती, आणि त्याच्या कष्टाने आणि कल्पकतेने तो संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध झाला होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---