---Advertisement---

Nashik : पेट्रोल टॅंकर उभ्या ट्रकवर आदळला ; दोन्ही गाड्यांचे चालक जागीच ठार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२५ । नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारातून भीषण अपघाताची घटना समोर आलीय. ज्यात पेट्रोल टॅंकरने उभ्या असलेल्या बियरच्या ट्रकवर जाऊन आदळला. या अपघातात दोन्ही गाड्यांचे चालक जागीच ठार झाले असून गाडीत इतर प्रवासी नसल्याने अधिकचा अनर्थ टळला.

या घटनेबाबत असे की, छत्रपती संभाजी नगर येथून बियरच्या बाटल्यांनी भरलेला मालट्रकचे टायर पंचर झाल्याने चालकाने मळढोण शिवारात रस्त्यावर ट्रक (क्र. MH – 20 cT 2932) उभा केला व पंक्चर काढण्याचे काम सुरु असताना त्याच वेळेत भरधाव वेगात नागपूर ते मुंबईकडे जाणारा जिओ कंपनीचा रिकामा असलेला पेट्रोल टॅंकर (mH 29 BE 2519) उभ्या असलेल्या बियरच्या ट्रकवर जाऊन आदळल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये ट्रकचालक (नाव समजू शकले नाही) ठार झाला. मागून भरधाव वेगात येणाऱ्या जिओ कंपनीचा पेट्रोल ट्रकचालक विजेंद्र मनी तिवारी हे अपघातात मयत झाले आहेत.

भरधाव वेगात येणाऱ्या जिओ कंपनीचा पेट्रोल ट्रकचालक विजेंद्र मनी तिवारी हे अपघातात मयत झाले आहेत. शिर्डी येथील वाहतूक शाखेच्या रुग्णवाहिकेत दोन्ही मयत चालकांना सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून वावी पोलीस मालक व नातेवाईकांशी संपर्क करत आहेत. नाशिक उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी घटनास्थळी पंचनामा करणार आहेत. बियर बॉटल बॉक्सचे वाहन कोठे जाणार असल्याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ट्रक चालकाची ओळख पटविण्याचे काम सुरु असून ट्रकच्या नंबर वरून नातेवाईक व मालकाचा संपर्क पोलीस करत आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लगड हे पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---