---Advertisement---

तलवार, कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोल पंप लुटला, नाशिकमधील धक्कादायक घटना

pump loot
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक-पुणे महामार्गावर एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात टाटा डीईएफ पंपावर चौघांनी तलवार, कोयता आणि दांड्यासह हल्ला करत पेट्रोल पंप लुटल्याची घटना घडलीय. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात अज्ञात आरोपीं आहे.

खरंतर राज्यासह नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी वाढताना दिसत असून जबरी चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत चालली आहे. याच दरम्यान, टाटा डीईएफ पंपावर रात्रीच्या वेळी चार दरोडेखोर कॅप व जर्किन घालून आले आणि पंपावर आले. चौघांनी कार्यालयात प्रवेश करताच त्यांनी कार्यालयाचे दार आतून बंद करुन घेतले.

त्यानंतर कार्यालयात काम करणाऱ्या अक्षय पालवे याच्याकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. यावेळी चौघांनी तलवार, कोयत्याचा धाक दाखवत गल्ल्यातील जवळपास ४० हजारांची रोकड लुटली व तेथून पलायन केले. पंपाच्या पाठीमागील बाजूस राणेखानचे जंगल असून त्याच भागातून अंधाराचा फायदा घेत चौघा दरोडेखोरांनी पंपाच्या कार्यालयात प्रवेश केला.

या अज्ञात आरोपींचा शोध सध्या सुरु आहे. त्यांच्याविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावर सुरक्षेचा मोठा सवाल आता उपस्थित राहिला आहे. सतत घडणाऱ्या या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---